रामदास आठवलेंनी घेतला शशी थरूरांचा Class

रामदास आठवलेंनी घेतला शशी थरूरांचा Class

काँग्रेसचे नेते लोकसभा खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. इंग्रजी भाषेवर त्यांचे असलेले प्रभुत्व, त्यांच्याकडील शब्दभांडार यामुळे थरूर हे कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते असे काही इंग्रजी शब्द वापरतात ज्याचे अर्थ शोधायला डिक्शनरी घ्यावी लागते. पण हेच शशी थरूर चक्क इंग्रजी बोलताना चुकले आहेत आणि त्यांची ही चूक शोधल्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या अनोख्या अश्या भाषण शैलीमुळे आणि सादर केलेल्या कवितांमुळे रामदास आठवले कायमच हशा उडवून देतात. पण गुरुवार १० फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी शशी थरुर यांची इंग्रजीतील चूक शोधली, ती सुधारली आणि सर्वांनाच चकित करून सोडले.

हे ही वाचा:

हिजाब वादावरून दोन नेत्यांची भिन्न मते…बिघडले महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार?

बूट पॉलिश करणारे रेल्वेविरोधात आक्रमक…. CSMT स्थानकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

भारत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देणार?

लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन

नेमके काय घडले?
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळचा एक फोटो शशि थरुर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यासोबतच एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा उल्लेख केला आहे. थरूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री आठवले हे निर्मला सीतारामन यांच्याकडे आश्चर्यचकीत मुद्रेने बघत आहेत. त्यामुळे सीतारामन यांनी बजेट आणि अर्थव्यवस्थेविषयी केलेल्या दाव्यामुळे आठवलेही हादरून गेल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

पण इंग्रजी भाषेत हे ट्विट लिहिताना थरूर यांनी दोन चुका केल्या आहेत. थरुर यांनी दोन शब्दांचे स्पेलिंग चुकवले आहे. ते शब्द म्हणजे रिप्लाय आणि बजेट! यावरूनच आठवले यांनी थरूर यांच्यावर निशाणा साधला असून तथ्य नसलेले दावे करताना चुका होतात असे लिहीत आठवले यांनी थरूर यांच्या इंग्रजीतील चुका सुधारल्या आहेत सोशल मीडियावर हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Exit mobile version