‘समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय’

‘समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय’

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबीच) अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून समीर वानखेडेंबद्दल बोलले जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे, अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘समीर वानखेडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते. वानखेडे हे एक मागासवर्गीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना टार्गेट केले जात आहे,’ असे आठवले म्हणाले.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

भारतीय संघाला बाबर घाबरला का?

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

‘समीर वानखेडे यांची एका वर्षात नोकरी जाणार असे नवाब मालिकांनी विधान केले होते, हे चुकीचे आहे. मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थांच्या संदर्भात अटक झालेली आहे. त्यामुळेच अशी वक्तव्य मलिक करत आहेत. नुसती केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचे काम मलिक करत आहेत. पण वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असे सांगतानाच समीर वानखेडे यांचे जर काही चुकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले.

प्रभाकर साईल या के पी गोसावीच्या अंगरक्षकाचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणे गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली. आर्यनला पकडू नये यासाठी डिलिंग होऊ शकते, पण आर्यनला पकडल्यानंतर ही सगळी डिलिंग कशी होते? सवालही त्यांनी केला. शाहरुख खान यांना पैसे द्यायचेत असतील तर जेव्हा आर्यनला पकडलं तेव्हाच ही प्रोसेस झाली असती. पण आता एनसीबीने या प्रकरणात चार्जेस लावलेले आहेत आणि कोर्टात केस स्टँड झालेली आहे. आता या प्रकरणाची डिलिंग चौकशी होऊ शकते?, असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version