“मविआ सरकार अल्पमतात; उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

“मविआ सरकार अल्पमतात; उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे.

“एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,” असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेच्या दोन नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली असून शिवसेनेने मात्र त्यांना गटनेते पदावरून काढून टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून शिवसेनेचे नाव हटवत ट्विट केले आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्यासोबत १३ आमदार आहेत.

Exit mobile version