राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव केला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीबद्दल त्यांचे अनेक नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. या निकालानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनीही ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
“राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखवली आहे. निवडणूक कशी जिंकायची ते देवेंद्र फडणवीस यांनी शिकवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकवली आहे,” असे ट्विट करत रामदास आठवले यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे.;
निवडणूक कशी जिंकायची ती शिकविली आहे.
तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे.@Dev_Fadnavis— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 11, 2022
हे ही वाचा:
नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला
“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”
संत तुकारामांच्या अभंगातून संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
प्रयागराजमध्ये हिंसाचारानंतर ६८ जणांना अटक
दरम्यान, सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उतरले होते. महाविकास आघाडी सरकारचे चार उमेदवार होते तर भाजपाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. निवडणुकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजपा आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. भाजपाकडून पीयुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा विजय झाला. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले.