रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत केले आहे. उत्तर प्रदेशामध्ये भाजपाचे सरकार येणार असून पुन्हा एकदा भाजपच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे भाकीत आठवले यांनी केले आहे आणि ते पण आपल्या हटके अंदाजात.
रामदास आठवले हे कायमच आपल्या अनोख्या अंदाजासाठी चर्चेत असतात. राजकारणाच्या तापलेल्या वातावरणात आठवले यांच्या राजकीय कविता कायमच चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या असतात. ट्विटरवर त्यानिओ अशीच एक राजकीय भाष्य करणारी कविता पोस्ट केली आहे. आपल्या या कवितेत आठवले म्हणतात की,
योगी नही है दागी, चुनकर आयेंगे आदित्यनाथ योगी!
अखिलेश यादव की हो जायेगी हार, बीजेपी करेगी तीन सौ पार।
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पद पर हो जायेगे सवार,
ये लड़ाई हम जीतेंगे आर-पार !https://twitter.com/RamdasAthawale/status/1498295697929478144?s=20&t=SgcjvDaxQj_16eQ1KXvD0w
हे ही वाचा:
‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’
पोलंडच्या राजदूताने केला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या खोट्याचा पर्दाफाश
युक्रेनला भारताकडून मदतीचा हात
‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’
आठवलेंची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून त्याची चर्चा होताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा या कवितेतून आठवल्यांनी केला आहे. तर पुन्हा एकदा भाजपच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता आठवले यांचा हा दावा खरा ठरणार का हे १० मार्च रोजी स्पष्ट होईल. १० मार्च रोजी देशभरातील पाचही विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे.