31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणरिपाई छेडणार ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

रिपाई छेडणार ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री रामदास आठवले ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणार आहेत. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी राज्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना रिपब्लिकन पक्षातर्फे वाचा फोडली जाणार आहे.

पदोन्नतीमध्ये एससी एसटी समाजासाठी आरक्षण मिळावे, २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेले्यांच्या झोपड्यांना घरांना कायदेशीर मान्यता मिळावी, भूमिहीनांना पाच एकर जमीन देण्यात यावी अशा विविध मागण्या रिपब्लिकन पक्षातर्फे केल्या जाणार आहेत. तर १९९० सालच्या कट ऑफ डेटमध्ये वाढ करून १४ एप्रिल २००० सालापर्यंतचे गावरान जमिनीवरील भूमिहीन मागासवर्गीय यांचे अतिक्रमण कायदेशीर करावे अशीही मागणी आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभर प्रत्येक तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले जाणार आहे. १० मे रोजी हे आंदोलन पार पडेल.

हे ही वाचा:

‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’

मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये

राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल

व्लादिमीर पुतीन यांच्यावर होणार कर्करोगाची शस्त्रक्रिया

तरी या सोबतच २८ मे रोजी मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाचा अतिप्रचंड मेळावा घेतला जाणार आहे. चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. येत्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. त्यासाठी तयारीला लागायचे आदेशही सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. त्या निमित्तानेच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आठवले यांनी भोंग्यांच्या बाबतही भूमिका घेतलेली दिसते. राज ठाकरे यांची भूमिका संविधान विरोधी असल्याचा घणाघात आठवले यांनी केला आहे. तर मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण रिपब्लिकन पक्ष करेल असा इशारा आठवले यांनी दिला आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा