मंत्री नवाब मलिक हे रोज एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर नवनवे आरोप करत आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजाचे नेते आणि आंबेडकरांचे अनुयायी आहात, आपण या संबंधी भूमिका घेतली पाहिजे, असे त्यांनी मला विनंती केली आहे. आमच्या पाठिशी उभे राहा, असे त्यांनी म्हटले आणि मी त्यांच्या पाठिशी उभा आहे. त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत.
नवाब मलिकांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं म्हटलंय कारण या पिक्चरमध्ये अजून मी आलो नाहीये. आता माझी एंट्री झाली आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी वानखेडे कुटुबीयांना पाठिंबा देत म्हटलंय की, मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. हे बाबासाहेबांचे अनुयायी असून ते महारच आहेत. ते मुस्लिम नाहीयेत. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी मला सगळी कागदपत्रे दाखवले आहेत. नवाब मलिकांनी केलेले आरोप सगळे खोटे आहेत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहेत.
हे ही वाचा:
‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’
भोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’
दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू
गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार
त्यांच्या जावयाला आठ महिने डांबण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा गैरवापर करुन ते दररोज गंभीर आरोप करत आहेत, जे चुकीचे आहे. समीर वानखेडेंचे कुटुंब मुस्लिम नसून दलितच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.