आपल्या राजकारणात ओढून ताणून प्रबोधिनीसारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये

आपल्या राजकारणात ओढून ताणून प्रबोधिनीसारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मास्टर सभा पार पडली. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केलेच. पण त्यावेळी अराजकीय संघटनांवरही टीका केली. या वेळी मुख्यमंत्री यांनी विनाकारण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या प्रशिक्षण संस्थेलाही मधे खेचले. पण आता मुख्यमंत्र्यांच्या याच टीकेला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने उत्तर दिले आहे. तुमच्या राजकारणात आम्हाला खेचू नका! असे म्हणत प्रबोधिनीने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतून भाजपावर निशाणा साधताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मध्ये खेचले. प्रबोधिनीत भाजपाच्या कार्यकर्त्यांना हेच प्रशिक्षण दिले जाते का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या याच प्रश्नाला म्हाळगी प्रबोधिनीने उत्तर दिले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत हे उत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षीय राजकारणात ओढून ताणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या ज्ञानकेंद्राला खेचू नये. प्रबोधिनी ही संयुक्त राष्ट्रसंघानेही सल्लागार संस्था म्हणून नावाजलेली एक प्रशिक्षण व संशोधन संस्था आहे. तिथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शिवसेनेसह सर्व प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाभ घेतला आहे . प्रमोद महाजनांनंतर आता लोकतांत्रिक प्रक्रियेतून निवडलेले देवेंद्र फडणवीस हे संस्थेचे अध्यक्ष आहेत व विनय सहस्रबुद्धे आजही उपाध्यक्ष आहेतच. संस्थेचे काम पूर्वी सारखेच सुरळीत व नव्या काळानुरूप आणखी गतीशीलतेने सुरू आहे.”

Exit mobile version