“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा सोमवार, १९ जुलै रोजी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी नेतेपद सोडत असल्याचे म्हटले. त्यानंतर रामदास कदम यांनी आज त्यांच्या भूमिकेविषयी ‘टीव्ही ९’ शी संवाद साधला. शिवसेना कोसळत असताना पाहवत नाही असे रामदास कदम यांनी भावूक होऊन सांगितले.

बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अशी आपली ओळख आहे. ज्या शिवसेनेसाठी ५२ वर्षे झटलो त्याच पक्षातून राजीनामा द्यायची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. महाविकास आघाडीत जाऊ नका अशी विनंती उद्धव ठाकरेंना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आपण लढून हिंदुत्त्वाला पाठींबा दिला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे सत्तेत बसले. बाळासाहेब जर आज असते तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरेंना जाऊ दिलं असतं का? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली. अजित पवार केवळ राष्ट्रवादीच्या आमादारांना निधी द्यायचे. त्यांची साथ सोडा अजूनही वेळ गेलेली नाही, असे रामदास कदम म्हणाले. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? असा सवालही त्यांनी विचारला. आदित्य ठाकरेंनीही संयम पाळायला हवा होता. आक्षेपार्ह भाषेत त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती त्यावरून रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन

संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?

आता पक्षातून हकालपट्टी करत आहेत. पण अजून किती जणांची हकालपट्टी करणार आहेत. हकालपट्टी करण्यापूर्वी त्या आमदारांच, पदाधिकाऱ्यांचे पक्षासाठी योगदान तर बघा, असेही रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे फक्त भाषणात सांगतात की, मी तुमच्यामुळे आहे. पण शिवसेनेवर आज ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं असल्याचं रामदास कदम म्हणाले. शिवसेना आम्ही उभी केली. अंगावर केसेस घेतल्यात, असे रामदास कदम म्हणाले. आता शिवसेना पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी कामाला लागणार. जगलो ते पक्षासाठी आणि मरण पण भगव्यासाठी, असे रामदास कदम म्हणाले.

Exit mobile version