महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागातील भरती परीक्षांचा गोंधळ संपता संपत नाहीये. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या भरतीतील गोंधळानंतर आता म्हाडाच्या भरती परीक्षेत गोंधळ झाला आहे. रविवार, १२ डिसेंबर रोजी होणारी ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवार, ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे.
सरकारच्या या भोंगळ कारभारा विरोधात राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांसोबतच विरोधी पक्षाचे नेतेही या संदर्भात आक्रमक झाले असून मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे सरकारवर हल्ला चढवताना दिसत आहेत. महाराष्ट्र भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांनी जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा:
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान अशी थट्टा तरी करू नका
महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी शहराकडे आले. आज परीक्षा होती. विद्यार्थी रेल्वेने, एसटीने, मिळेल त्या वाहनाने आले आले. एक एक रुपया गोळा करून विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये जागा मिळवण्यासाठी आजच्या परीक्षेची वाट पाहत होते. पण महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकारने पहाटेच्या वेळेस म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय घेतला. या गचाळ आणि वाचाळ सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती गाढवाचा नांगर काम फिरवायचे काम केले आहे. सरकारला या बाबतीत जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ हकालपट्टी करावी” असा हल्लाबोल सातपुते यांनी केला आहे.
तर शरद पवार यांच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील तरूणाला देशोधडीला लावण्याचा संकल्प या महाविकास आघाडी सरकारने केला आहे का? असा संतप्त सवालही राम सातपुते यांनी विचारला आहे
महाराष्ट्रातील नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का.? सकाळी होणारी म्हाडाची परीक्षा पहाटे 2 वाजता परीक्षा रद्द करतात.थोडी लाज शिल्लक असेल मंत्री आव्हाड यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा. @abpmajhatv @TV9Marathi @Dev_Fadnavis @News18lokmat @BJP4Maharashtra @OfficeofUT pic.twitter.com/MawYgOlkLd
— Ram Satpute (@RamVSatpute) December 12, 2021