राम मंदिर निधी संकलन यात्रांवर हल्ले

राम मंदिर निधी संकलन यात्रांवर हल्ले

राम मंदिर निधी संकलन यात्रा ही दिल्लीतसुद्धा होणार आहे. भव्य राम मंदिर बांधण्यासाठी भारतभर निधी संकलन यात्रा निघत आहेत. राम भक्त घरोघर निधी गोळा करायला जात आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीतही निधी संकलन यात्रा काढणार आहेत. १ फेब्रुवारीला उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आणि भाजपा दिल्लीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी ही निधी संकलन यात्रा आयोजित केली आहे.

डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिर उभारण्याच्या कामाला सुरवात झाली. २०२० मध्ये कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे या कामात खंड पडला होता. परंतु आता १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात देशभर निधी संकलनाचे काम सुरु झाले आहे.

भारतात इंदोर आणि भोपाळ सारख्या अनेक ठिकाणी निधी संकलन यात्रेवर मुस्लिम बहूल भागात हल्ले झाले. त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरातसुद्धा अनेक ठिकाणी राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर शासनाकडून काढण्यात आले आहेत. या घटनांनंतर “आपण भारतात निधी संकलन करत आहोत का पाकिस्तानात?” असा सवाल अनेक रामभक्तांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.

या सगळ्या घटनांनंतरही काही डाव्या संगठनांनी राम भक्तांवरच धार्मिक मुद्द्यांवर तेढ पसरवण्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version