24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत

Google News Follow

Related

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत ट्विट केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. हैद्राबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच हैद्राबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे.

भाजपा ज्येष्ठ नेते जी नारायण रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“जर द्रौपदी राष्ट्रपती असतील तर पांडव कोण आणि महत्त्वाचं म्हणजे कौरव कोण असतील?” असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. मात्र, त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. द्रौपदी हे महाभारतातील माझं आवडतं पात्र आहे. परंतु, हे नाव फारच दुर्मिळ आहे. मला त्या पात्राची आठवण झाली आणि मी हे ट्विट केलं.”

हे ही वाचा:

… आणि २० देश जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येणार

पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

पोलीस निरीक्षक बी प्रसाद राव यांनी सांगितले की, “आमच्याजवळ तक्रार आली आहे. जी आम्ही कायदेशीर पडताळणीसाठी पाठवली आहे. कायदेशीर अभिप्राय मिळाल्यानंतर आम्ही राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करू,” अशी माहिती देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा