‘समाजकंटकांमुळे’ रॅलीला हिंसक वळण

‘समाजकंटकांमुळे’ रॅलीला हिंसक वळण

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश तिकैट यांनी सांगितले की, मंगळवारी शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसक वळण लागण्यामागे काही समाजकंटकांचा हात आहे. दिल्ली पोलिसांच्या काही कृत्यांमुळे काही समाज विघातक घटकांचा आंदोलनात शिरकाव झाला असेही त्यांनी सांगितले आहे.

भारतीय किसान युनियनच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड चुकीच्या पद्धतीने घातली होती.

“हे मुद्दाम शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आले.” असेही तिकैट यांनी म्हटले आहे. त्यांच्यामते याच्यामुळेच ट्रॅक्टर चालक शेतकरी भरकटले.

त्यामुळे समाज विघातक घटकांना रॅलीत शिरकाव करण्याची संधी मिळाली, असा दावाही त्यांनी केला आहे.

तिकैट यांनी शेतकऱ्यांना हिंसाचारापासून दूर राहण्याची विनंती केली. त्याबरोबरच समन्वय समितीचे सदस्य या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारा मागची कारणे देखील शोधून काढतील, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या लगतच्या राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनीच आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा आग्रह धरला होता. ही रॅली ठरलेल्या मार्गवरून न जाता मध्य दिल्लीकडे नेण्याचा आग्रह दंगलखोरांनी धरल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर दिल्लीत मोठा हिंसाचार उफाळून आला, ज्यात पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले.

Exit mobile version