24 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामाटिकैट यांचा तोल ढळला

टिकैट यांचा तोल ढळला

Google News Follow

Related

दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर चालू असलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रवक्ते, नेते राकेश टिकैट यांचा तोल ढळला आणि त्यांनी एका माणसाच्या कानफटात लगावली. या माणसाची अजून ओळख पटलेली नाही.

“तो माणूस आमच्या संघटनेचा सदस्य नव्हता. तो काठी हिसकावून घेत होता आणि काहीही करू शकला असता. तो माध्यमाशी योग्य तर्हेने वागत नव्हता. जे कोणी इथे गैर इच्छेने आले असतील त्यांनी तात्काळ इथून निघून जावे.” असे राकेश टिकैट यांनी सांगितले.

यादरम्यान केंद्र सरकारने रॅपिड ऍक्शन फोर्सच्या (आरएएफ) नव्या तुकड्या तैनात करण्याचा निर्णय ४ फेब्रुवारी पर्यंत वाढवला आहे. शेतकऱ्यांच्या निदर्शनांचा विचार करता, कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी त्यांची नियुक्ती २८ जानेवारीपर्यंतच करण्यात आली होती, मात्र आता त्यांना अधिक काळासाठी तैनात करण्यात आले आहे.

गाझीपूर येथील शेतकऱ्यांना सीआरपीसीच्या १३३ व्या नियमा अंतर्गत नोटिस बजावण्यात आली आहे. गाझियाबादचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार सिंग यांनी ही कारवाई केली आहे.

यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैट यांना २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल आपल्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न विचारणारी नोटिस देखील दिली आहे.

या नोटिशीत असे देखील सांगण्यात आले आहे, की या हिंसाचारामागे असलेल्या आपल्या संघटनेतील लोकांची नावे आपण पोलिसांना सांगावीत. आपण आपले उत्तर तीन दिवसात द्यावे.

मंगळवारी झालेल्या हिंसाचाराशी संबंध असलेल्या एकोणिस लोकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे आणि २५ फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस कमिशनर एस एन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात ३९४ पोलिस जखमी झाले. ज्यापैकी अनेक अजूनही हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहेत.

या हिंसाचारात अनेक सार्वजनिक आणि खासगी गाड्यांचे नुकसान झाले. त्याबद्दल २२ एफआयआर दिल्ली पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा