‘राहुल गांधी प्रत्येक मुद्द्याचे फक्त राजकीय भांडवल करतात’

‘राहुल गांधी प्रत्येक मुद्द्याचे फक्त राजकीय भांडवल करतात’

The Minister of State for Youth Affairs and Sports (I/C) and Information & Broadcasting, Col. Rajyavardhan Singh Rathore addressing after felicitating the winners of the World Youth Boxing Championship 2017, at a function, in New Delhi on December 08, 2017.

भाजप नेते राज्यवर्धन राठोड यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला की, राहुल गांधी काँग्रेस शासित राज्यांकडे लक्ष देत नाहीत, फक्त इतर राजकीय पक्षांच्या अधिपत्याखालील राज्यांशी राजकारण करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचारावर राजकारण करत आहेत आणि तेथे जाण्याच्या त्यांच्या आग्रहावर ते ठाम आहेत. दरम्यान, योगी सरकारने लखीमपूरला जाणाऱ्या विरोधी नेत्यांना परवानगी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राज्यवर्धन राठोड म्हणाले, ‘याची संपूर्ण जबाबदारी ही केवळ काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची नाही तर मुख्यमंत्र्यांचीही आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यांची राज्ये सोडून ‘एक जागा- एक व्यक्ती’चा गौरव करण्यासाठी धावाधाव करत आहेत. काँग्रेसमध्ये काय चूक आहे हे ते दाखवत आहेत.’ केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर लखीमपूर खिरी हिंसाचारावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर राठोड यांचे हे वक्तव्य आले आहे. अशोक गेहलोत म्हणाले होते की, देशातील ‘लोकशाही’ धोक्यात आहे. श्रीगंगानगर जलसंकटावरून राठोड यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. ‘सध्या श्री गंगानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध होत आहे. लोक पाण्याची मागणी करत आहेत. पण सरकार तिथे पोहोचले नाही. नेतृत्वाचे लक्ष इतर काही राज्यांवर आहे.’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेकडे किती अण्वस्त्र?

एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?

हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेची वारंवार मागणी करत असलेल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत कर्नल राठोड म्हणाले की, ‘आपली पदे आणि जबाबदाऱ्या सोडून केवळ राजकारण करणे हे आजचे राजकारण नाही. एका कुटुंबाला खुश करण्यासाठी सर्व मुख्यमंत्री एकत्र येत आहेत. काँग्रेस जमिनीवर काम करत असल्याचे मात्र दिसून येत नाही.’

राहुल गांधी प्रत्येक बाबतीत राजकारण करत आले आहेत. दिल्लीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण असो. त्यांनी प्रत्येक मुद्द्याचे राजकीय दृष्टिकोनातून भांडवल करण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम काँग्रेससमोर आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी त्याबद्दल काहीही वक्तव्य केले नव्हते. राहुल गांधी इतर राजकीय पक्षांच्या अधिपत्याखालील राज्यांमध्ये आपले राजकारण चमकवण्यासाठीच भेटी आणि निषेध करत असतात.

Exit mobile version