राज्यसभेचे सात वेळचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र प्रसाद यांचे निधन झाले आहे. एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे असून गेल्या काही काळापासून ते एका प्रदीर्घ आजाराशी झगडत होते.
महेन्द्र प्रसाद हे राज्यसभेतील ज्येष्ठ आणि अनुभवी खासदारांमधील एक असून आजवर ते सात वेळा बिहार मधून राज्यसभेवर निवडून गेले होते. तर एकदा ते लोकसभेवर निवडून गेले होते.
महेंद्र प्रसाद यांच्या निधनाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महेंद्र प्रसाद यांना आदरांजली वाहताना अरिस्ट्रो फार्मास्युटिकल्सचे संस्थापक महेंद्र प्रसाद यांच्या निधनाने समाजाचे तसेच राजकीय आणि उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पुण्यात ATM फोडले, १६ लाखांची चोरी
विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट
बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?
‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको’, विधीमंडळात ठराव एकमताने मंजूर
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. “राज्यसभा खासदार डॉ. महेंद्र प्रसाद जी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे संसदेत कार्य केले आणि अनेक सामाजिक सेवेच्या उपक्रमांमध्ये ते आघाडीवर असत. ते नेहमी बिहार आणि तेथील लोकांच्या कल्याणाबद्दल बोलत असत. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना.”