“एलओसी ओलांडू शकतो… ओलांडणार; राजनाथ सिंह यांचा इशारा

कारगिल विजयदिनानिमित्ताने पाकिस्तानला भरला दम

“एलओसी ओलांडू शकतो… ओलांडणार; राजनाथ सिंह यांचा इशारा

कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले, आमच्या पाठीत पाकिस्तानने खंजीर खुपसला… भारतावर युद्ध लादले गेले. मी आमच्या शूर पुत्रांना सलाम करतो ज्यांनी देशाला प्रथम स्थान दिले आणि आपले बलिदान दिले,” अशा शब्दांत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कारगिल विजयदिनाच्या निमित्ताने वीर जवानांना आदरांजली अर्पण करताना पाकिस्तानवर निशाणा साधला. २४ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त येथील कारगिल युद्ध स्मारकात राजनाथ सिंह बोलत होते.

 

राजनाथसिंह पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती आली, तेव्हा आमच्या जनतेने नेहमीच सैन्याला पाठिंबा दिला आहे, परंतु तो पाठिंबा अप्रत्यक्ष राहिला आहे. मी जनतेला आवाहन करतो की, गरज पडल्यास थेट रणांगणात सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी तयार राहावे.” “देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो… जर त्यात नियंत्रण रेषा ओलांडणे ही बाब येणार असेल तर आम्ही ते करण्यास तयार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास

गांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री

वर्षभरात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंडशी मायदेशात भारतीय संघ करणार दोन हात

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी स्पष्ट केले की भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी वेळ आणि गरज पडल्यास सीमा नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे आणि अशा परिस्थितीत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, हे युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे कारण दोन्ही देशांचे सामान्य नागरिक पुढे आले आहेत आणि ते या युद्धात सहभागी होत आहेत.

 

तत्पूर्वी, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मारकावर पुष्पहार अर्पण केले. १९९९ मध्ये लडाखमधील महत्त्वाच्या उंचीवर गुप्तपणे कब्जा करणार्‍या पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलण्यासाठी भारतीय लष्कराने जोरदार प्रतिआक्रमण सुरू केले होते. यात भारतीय लष्कराने निकराने लढा देत जोरदार हल्ला चढवला आणि पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून चितपट केले होते. कारगिल विजय दिवस हा भारताचा पाकिस्तानवर विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.

Exit mobile version