राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवार, १८ मे रोजी आदेश दिले आहेत. राजीव गांधींचा मारेकरी गेल्या ३१ वर्षपासून शिक्षा भोगत आहे.

ए. जी. पेरारिवलन असे या मारेकऱ्याचे नाव आहे. तामिळनाडू सरकारने पेरारिवलनच्या सुटकेसाठी प्रस्ताव मंजूर केला होता. पेरारिवलनची दया याचिका राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे बराच काळ प्रलंबित राहिल्याने न्यायालयाने मोठा निर्णय घेत त्याची सुटकेची याचिका मंजूर केली. या निकालामध्ये इतर सहा जणांच्या सुटकेचा मार्गही मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तमिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ११ जून रोजी पेरारिवलन याला अटक करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यावेळी पेरारिवलनचे वय १९ वर्ष होते. तेव्हपासून गेले ३१ वर्ष तो तुरुंगात आहे. १९९८ मध्ये न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

हे ही वाचा:

रशियाचा मोठा विजय, मारियुपोलवर ताबा

पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

आरेमधल्या झाडांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची वाशीमधल्या झाडांसाठी चुप्पी

तमिळनाडू सरकारने २००८ मध्ये त्याच्या सुटकेच्या निर्णय घेतला होता. पण राज्यपालांनी हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठवले. तेव्हापासून त्याच्या सुटकेचा निर्णय प्रलंबित होता. त्यांनतर २०१४ मध्ये या शिक्षेचे रूपांतर आजीवन कारावासामध्ये करण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version