26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार

Google News Follow

Related

अमरावतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश वानखडे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची चर्चा आहे. वानखडे हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसनेतील अनेकांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. अमरावतीमधूनही शेकडाे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये अगाेदरच शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यातच आता शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी देखील शिवसेनेला साेडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीमधील पडझड राेखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या नवीन नियुक्त्यांमध्ये काही पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. तर काही पदाधिकाऱ्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिवसा, अचलपूर, मेळघाट विधानसभा क्षेत्र, धामणगाव रेल्वे, मोर्शी विधानसभा क्षेत्र, अमरावती, बडनेरा आणि दर्यापूर आदी विविध ठिकाणी नवीन नियुक्त्या करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी सुनील खराटे, राजेश वानखडे यांना जिल्हाप्रमुखपदी कायम ठेवण्यात आले हाेती. आता वानखडे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला आणखी एक माेठा धक्का बसणार आहे.

हे ही वाचा:

सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी

तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले

उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तुरुंगात भेटणार होते पण

दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर हे देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. किर्तीकर यांनी साेमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या निवास्थानी भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किर्तीकरही शिवसेनेची साथ साेडणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतील बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर यांच्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे स्वतः किर्तीकरांच्या घरी जाऊन त्यांना भेटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा