आरोग्यमंत्र्यांनी लसीबाबत दाखवले केंद्राकडे बोट

आरोग्यमंत्र्यांनी लसीबाबत दाखवले केंद्राकडे बोट

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा जुना लस संपत असल्याचा पाढा वाचून दाखवला.

आरोग्य मंत्र्यांनी आज संवाद साधताना महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच त्यांनी आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं अशी इच्छा देखील व्यक्त केली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकी संदर्भात त्यांनी लोकांना माहिती दिली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आतापर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचना, नियमांचं आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं महाराष्ट्रानं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिली.

हे ही वाचा:

लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

यावेळी बोलताना महाराष्ट्रात ज्या ज्या टीम आल्या, त्यांचे नियम आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्राने करून दाखवलं असा दावा देखील त्यांनी केला. त्याबरोबरच पुन्हा एकदा महाराष्ट्रात लस संपल्याचे खापर त्यांनी केंद्रावर फोडले. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे केवळ लस नसल्याने बंद करावी लागत आहेत. केंद्राकडून होणारा पुरवठा योग्य गतीने होत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्याबरोबरच प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून ६ लाख लोकांचं लसीकरण करा डोस केंद्राकडून पुरवले जातील असे सांगितल्याचे देखील ते म्हणाले. केंद्राकडे वेगाने लसपुरवठा करण्याची मागणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सध्या लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगून लसीकरण वाढवण्यासाठी लस पुरवली गेली तर महत्त्वाचा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

वाया जात असलेल्या लसींच्या डोसवर ते काही बोलले नाहीत. त्याबरोबरच बेड्स वाढवत आहोत एवढीच मामुली माहिती त्यांनी दिली. सरकारच्या निर्बंधांच्या विरोधात जो रोष निर्माण झाला आहे आणि विविध राजकीय नेत्यांकडून निर्बंधांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे, त्यावर देखील ते काही बोलले नाहीत

Exit mobile version