शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचे घोटाळे सतत समोर येत असतात. आता शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सुद्धा पालघर जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकरच भाजपच्या साडे तीन नेत्यांना तुरुंगात धाडण्याचे विधान सोमवारी केले. त्यानंतर लगेच शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा दिल्यामुळे शिवसेनेच्या अडचणींत वाढ झाली आहे.

पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी जागेच्या व्यवहारातून चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटी रुपयांचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश बाउन्स झाल्याने त्यांच्या विरोधात पालघर जिल्हा न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा न्यायालयाने गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हे ही वाचा:

१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार नवी लस

पुलवामा हल्ला आणि बदललेला भारत!

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

काही दिवसांपूर्वीच राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी यासंदर्भात २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांना २५ हजार रुपये दंड, तसेच दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Exit mobile version