राजदीप सरदेसाईंची पत्नी सागरिकावर तृणमूल मेहेरबान, मिळाले राज्यसभेचे तिकीट

तृणमूल काँग्रेसने नावे केली जाहीर

राजदीप सरदेसाईंची पत्नी सागरिकावर तृणमूल मेहेरबान, मिळाले राज्यसभेचे तिकीट

सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेणारे आणि तटस्थ पत्रकारितेचा दावा करणारे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी सागरिका घोष यांना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसने राज्यसभेचे तिकीट दिले आहे. चारजणांची नावे तृणमूलने ट्विट करत जाहीर केली.

रविवारी तृणमूल काँग्रेसने ‘पत्रकार’ सागरिका घोष यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली. पश्चिम बंगालमधील चार जणांची निवड तृणमूल काँग्रेसने जाहीर केली, त्यात सागरिका यांचे नाव आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ही नावे जाहीर करताना एक्सवर संदेश पाठवला की, सागरिका घोष, सुश्मिता देव, नदिमुल हक, ममता बाला ठाकूर यांना आम्ही राज्यसभेची उमेदवारी देत आहोत,त्याचा आम्हाला आनंद होत आहे. आमच्याकडून या सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा. तृणमूल काँग्रेसचे नाव उज्ज्वल करण्यात त्यांनी आपले योगदान द्यावे, ज्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांचे हक्क, अधिकार याकडे लक्ष वेधले जाईल.

इंडिया टुडेमध्ये वरिष्ठ पत्रकार असलेल्या राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी म्हणून सागरिका यांची ओळख आहेच पण पत्रकार म्हणूनही प्रमुख वर्तमानपत्रांत, वाहिन्यांवर त्यांनी काम केलेले आहे. शिवाय, पत्रकार असतानाही ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस यांची तारीफही त्यांनी अनेकवेळा केलेली आहे. २०२१मध्ये पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सागरिका यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्या नैसर्गिक राजकारणी आहेत आणि ताकदीनिशी त्या लढतात.

त्यावेळी ममता बॅनर्जी यांना अपघात झाला होता आणि त्यांचा पाय त्यात फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा सागरिका यांचे हे ट्विट प्रसिद्ध झाले होते. जेव्हा ममता बॅनर्जी यांचे नाव घोटाळ्यात घेतले गेले तेव्हा सागरिका यांची बंगाल अस्मिता जागृत झाली होती. त्याच निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला होता तेव्हा सागरिका यांनी गप्प राहणे पसंत केले होते.

गेल्या वर्षी सागरिका यांनी ट्विट केले होते की, महुआ मोइत्रा यांची खासदारकी संपुष्टात आणून भाजपाने काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांना बंगालमध्ये एकत्र आणले आहे. बंगालमधून निवडून आलेल्या एका महिला खासदाराची खासदारकी रद्द करून बंगालच्या जनतेचा अपमान केला आहे.सागरिका यांनी अनेकवेळा व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजेसच्या आधारे हिंदूविरोधी किंवा भारताची प्रतिमा खराब करणारे ट्विट करत बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सागरिका यांना मिळालेल्या या राज्यसभेच्या उमेदवारीमुळे भुवया उंचावल्या आहेत.

Exit mobile version