जुने ते सोने…राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी वाचला जुना अर्थसंकल्प

सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले, विरोधकांनी गदारोळ केला

जुने ते सोने…राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी वाचला जुना अर्थसंकल्प

नव्या वर्षात प्रत्येक माणूस नवा संकल्प करतो. पण राजस्थानात उलटेच घडले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चक्क गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचून दाखविला. शुक्रवारी मुख्यमंत्री गेहलोत यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प राजस्थान विधानसभेत वाचून दाखविला. त्यावेळी त्यांचे मंत्री महेश जोशी यांनी गेहलोत यांना याची कल्पना दिली. आणि सभागृहात एकच हलकल्लोळ उडाला. सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. त्यावर विरोधी पक्ष अर्थात भाजपाने जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचून दाखविला म्हणजे या वर्षीचे बजेट लिक झाले असले पाहिजे.

बचत आणि दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल असे सांगत मुख्यमंत्री गेहलोत सभागृहात आले आणि त्यांनी भाषण वाचण्यास सुरुवात केली. त्यातील २-३ परिच्छेद त्यांनी वाचले असतील की तेवढ्यात मंत्री महेश जोशी आपल्या आसनावरून उठून मागे गेले आणि तिथून परत येत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काही सांगितले. ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, हे भाषण वाचणे थांबवा. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, का? त्यावर जोशींनी सांगितले की, हे तुम्ही जुने भाषण वाचत आहात. गेहलोत यांनी चमकून मागील पान पाहिले तेव्हा त्यावर गेल्या वर्षीची तारीख होती. अर्थात, हे पाहिल्यावर तेदेखील हसू लागले.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

यावर विरोधी पक्ष भाजपाने सभागृह दणाणून सोडले. तेव्हा सभापतींनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण भाजपाचे सदस्य थांबत नव्हते. तेव्हा सभापतींनी सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेता गुलाब चंद कटारिया यांनी सांगितले की, अर्थसंकल्प लीक झालेला असल्यामुळे सादर करता येणार नाही. तेव्हा मुख्यमंत्री गेहलोत यांनी सांगितले की, असे काही झालेले नाही. त्यात गेल्या वर्षीचे पान जोडले गेले. सभागृहात अर्थसंकल्पाची जी प्रत सर्वांना वितरित करण्यात आली आहे, तीच आपण वाचत आहोत.

कटारिया यांनी असा सवाल उपस्थित केला की, या अर्थसंकल्पात जुन्या अर्थसंकल्पाचे कागद आले कसे? मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माफी मागितली पाहिजे.

Exit mobile version