काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेता राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी या संबंधीची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाटील यांच्या नावावर राज्यसभा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रतून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी आता निवडणूक होऊ घातली आहे.
रजनी पाटील या काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या त्यांच्याकडे जम्मू काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. या आधीही २०१३ ते २०१८ या कालावधीत रजनी पाटील या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. तर त्या आधी १९९३ ते १९९८ या कालावधीत बीड लोकसभा क्षेत्रातून निवडून येत खासदार म्हणून कामकाज केले होते.
हे ही वाचा:
गडहिंग्ल जसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला
रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा
संजय उपाध्याय असणार भाजपाचे राज्यसभा उमेदवार
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?
दरम्यान सोमवार, २० सप्टेंबर रोजी भाजपानेही राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपातर्फे मुंबईचे महामंत्री संजय उपाध्याय यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या संबंधीची अधिकृत घोषणा केली आहे.