महाराष्ट्रात शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. त्यांनतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपदासाठी शुक्रवार,१ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमदेवार अर्ज भरणार आहे. शिवसेनेकडून राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून अजून दोन अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेदखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं
धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?
दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका
भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनतर राहुल नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील.