भ्रष्टाचारविरोधी विभागाची राजन साळवी आणि कुटुंबियांकडे नजर

पाठवली नोटीस आणि चौकशी करण्याचे आदेश

भ्रष्टाचारविरोधी विभागाची राजन साळवी आणि कुटुंबियांकडे नजर

एसीबीकडून ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि कुटुंबियांना आता नोटीस आली आहे. या नोटिसीमध्ये २० मार्चला त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजन साळवी यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा एसीबीची नोटीस आली आहे.

राजन साळवी यांचे मोठे भाऊ, वहिनी आणि त्यांची पत्नी यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. गेल्या दोन महिन्यापासून राजन साळवी हे एसीबीच्या रडारवर होतेच. त्यांच्या घरची पाहणी एसीबीकडून करण्यात आली आहे. शिवाय त्यांना चौकशीसाठी पण बोलावण्यात आले आहे. आत्तापर्यंत राजन साळवी यांच्या अलिबागच्या एसीबी कार्यालयात हजर राहिले असून त्यांच्या स्वीय सहाय्यकाची सुद्धा यासंदर्भात चौकशी करण्यांत आली आहे.

मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबियांना नोटीस पाठवण्याची काय गरज? असा प्रश्न राजन साळवी यांनी उपस्थित केला आहे. आज सकाळी मला माझ्या कुटुंबियांना यांत माझी वाहिनी , मोठा भाऊ, माझी पत्नी यांना एसीबीची नोटिस आली आहे. ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे कि मला २० मार्चला अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितले आहे. मी आधीसुद्धा सांगितले आहे की, मी एक सर्वसामान्य शिवसैनिक असून तोच सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झाला आहे.

हे ही वाचा:

लालबाग हत्या, मुलीने तीन महिने आईच्या मृतदेहासोबत काढले

फडणवीसांनी ‘अजितदादां’ची केली कोंडी आणि मारली मुसंडी

मुंबईत घामाच्या धारांनंतर आता पावसाच्या धारा, अवकाळी आभाळ फाटले!

संसदेत माफी मागण्याऐवजी राहुल गांधी गैरहजर राहतात!

माझ्या मतदारसंघाला माहित आहे कि, राजन साळवी काय आहे ते. मला नोटीस आल्यावर मी जाहीर केले होते  कि मी या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करणार आहे आणि करत सुद्धा आहे. दरम्यान जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांनाच फक्त नोटीस पाठवण्यात येत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांची नाव संग्रही असली तरी त्यांना मात्र कोणत्याच नोटीस पाठवल्या जात नाहीत. तिकडे ते वॉशिग मशीन सारखे स्वच्छ होतात  आम्ही  फक्त दोषी आणि याचाच निषेध करत आहोत. असेही राजन साळवी नंतर म्हणाले.  शिवाय,  हा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोपही साळवींनी केला आहे. आमच्या कुटुंबाला हा नाहक त्रास देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे साळवी पुढे म्हणाले.

Exit mobile version