राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली व्यथा आणि कायदेशीर बाजू एसटी कामगारांनी मांडली. मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा बोलतो, असं आश्वासन राज ठाकरे यांनी कामगारांना दिलं. राज ठाकरे आणि कामगारांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, असं सांगतानाच आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा. असं आवाहन राज ठाकरे यांनी एसटी कामगारांना केलं.

“एसटी कामगारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. ते ताबडतोब सरकारशी बोलणार आहेत. स्वत: राज ठाकरे लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे.” असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

“कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील. असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील.” असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

मनसेचे वकील एसटी कामगारांसोबत राहतील. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहणार. पक्षही असेल आणि आमचे वकीलही राहतील. कायदेशीर लढाई सुरूच राहील. राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना ऐकल्या. २८ संघटनांनी हा संप जाहीर केला आहे. आता १ लाख कर्मचारी संघटना बाजूला ठेवून एकत्रं आले आहेत. संघटनाविरहित लढाई लढत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने १२ आठवड्याची मुदत दिली आहे. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. तर या प्रश्नी पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले.

Exit mobile version