मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त

मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. राज यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी आज सकाळीच राज ठाकरे यांचे येत्या काही दिवसातील सर्व मेळावे आणि दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. आज ठाण्यात बोलत असल्यानं ते म्हणाले, “आज भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांची (राज ठाकरे) प्रकृती खराब असल्यामुळे हा मेळावा तात्पुरता स्थगित केला आहे.

“मनसे आणि राज ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट आहे. हे मी नाही तर जनताच म्हणतेय. राज ठाकरे यांच्या रक्तात हिंदुत्व आहे. आमच्या झेंड्यातही ६० टक्के भगवा रंग आहे. कांचनगिरी महाराज आल्या तेव्हा त्यांनीही सांगितलं की राज ठाकरेंची भूमिका ही चांगली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास करा हे राज ठाकरे यांनीच पहिल्यांदा सांगितलं होतं.” असंही नांदगावकर यांनी आवर्जुन सांगितलं.

कांचनगिरीजी यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली होती. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असं सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

हे ही वाचा:

अखेर फैजाबाद स्थानकही बनले अयोध्या

‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च

काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?

दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश

दरम्यान, साध्वी कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

Exit mobile version