महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. गुडीपाडव्याला त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि मशिदीवरील भोंग्यांवरून यावरून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी उत्तर सभा घेतली आणि अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र तूर्तास त्यांनी अयोध्ये दौऱ्याला स्थगिती दिली आहे. त्यादरम्यान, रविवारी, २१ मे रोजी राज ठाकरे पुण्यामध्ये सभा घेणार आहेत. यसभेला पोलिसांनी तेरा अटी घालून परवानगी दिली आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे उद्या म्हणजे रविवारी, सकाळी १० वाजता राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राज ठाकरे अयोध्या दौरा अचानक स्थगित का केला, याविषयी कारण स्पष्ट करणार आहेत. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेत काय बोलणार, कोणावर तोफ डागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राज ठाकरे आज सकाळीच शिवतीर्थहून पुण्याला रवाना झाले आहेत.
हे ही वाचा:
पुस्तकाला प्रतिसाद न मिळाल्याने निरंजन टकलेंना सदमा!
लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
‘नवाब मलिक सरकारमध्ये राहावे यासाठी सगळी धडपड’
स्वारगेट पोलीस ठाण्याकडून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. या सभेसाठी पोलिसांनी तेरा अटी घातल्या आहेत. यामध्ये समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत, आवाजाची मर्यादा पाळावी, सभेमध्ये शस्त्र, तलवारी बाळगू नयेत, सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी पोलिसांना करण्याचा अधिकार, स्वागत फलक यामुळे वाहनाला त्रास होऊ नये, तसेच रुग्णवाहिकांनाही अडथळा येऊ नये, सभेत रूढी परंपरा वंश यावरून चिथावणी देऊ नये, सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी शिस्त पाळावी, सभेत चेंगराचेंगरी झाल्यावर याची जबाबदारी आयोजकांवर, कार्यक्रमाच्या वेळेत आणि स्थळात बदल करणे नाही, सभेला येणाऱ्या लहान मुलांची महिलांची व्यवस्था करणे आणि या सभेचे नियम पाळावेत याची जबाबदारी आयोजकांवर असेल, अश्या अटी सभेसाठी घालण्यात आल्या आहेत.