22 C
Mumbai
Sunday, January 12, 2025
घरराजकारणलटके यांच्या बद्दल राज ठाकरे यांचे पत्र आणि फडणवीस यांचे उत्तर

लटके यांच्या बद्दल राज ठाकरे यांचे पत्र आणि फडणवीस यांचे उत्तर

अंधेरीतील निवडणुकीबाबत लिहिले पत्र

Google News Follow

Related

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा रविवार शेवटचा दिवस आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीची चर्चा रंगलेली असतानाच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी यांनी केलं आहे. या पत्रामुळे निवडणुकीला नवीन वळण मिळाल्याच बघायला मिळत आहे. फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राद्वारे राज ठरे यांनी लटके यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडल्या मुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आशिष शेलार आणि अन्य भाजप नेत्यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली होती. त्यानंतर मनसे अंधेरी पोट निवडणुकीत भाजप निवडणुकीत पाठींबा देणार असल्याच्या तर्क वितर्कांना उधाण आले होते. पण या भेटीनंतर राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे आमदार रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असे ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हणत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. या सोबत मनसेची भूमिका स्पष्ट करणारे पत्र देखील सोबत जोडले आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन ठाकरे यांनी या पत्रात केलं आहे.

हे ही वाचा

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण

आमदार रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं असं राज ठाकरे यांनी पत्रात लिहिलं आहे.

 

चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रानंतर भाजप काय भूमिका घेते . फडणवीस काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही राज ठाकरे यांच्या पत्रावर मामला निर्णय घ्याचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल बाळासाबांची शिवसेना देखील आमच्या सोबत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे . त्यामुळे आता पुढे काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा