कुस्तीगीरांच्या आंदोलनात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करताना त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी कुस्तीगीर करत आहेत. त्यासाठी दिल्लीत गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. त्यावरून आता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वतःकडे लक्ष वेधले आहे.
याआधी, प्रियांका गांधी यांनी या कुस्तीगीरांची भेट घेतली होती नंतर केजरीवालही त्यांना भेटायला गेले. ममता बॅनर्जी यांनीही कुस्तीगीरांना पाठिंबा दिला आहे तर महाराष्ट्रातले दिग्गज राजकारणी शरद पवार यांनीही खेळाडूंना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काही ठिकाणी आंदोलने घेतली. आता या राजकारणात राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपल्याकडे लक्ष वळवले आहे.
राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना आवाहन केले आहे की, त्यांनी या प्रकरणात तोडगा काढावा. या लढाईत कुणाच्याही बाहुबलाचं दडपण येणार नाही, याची खात्री सरकारकडून हवी असे कुस्तीगीरांचे म्हणणे आहे ती हमी सरकारने द्यावी.
हे ही वाचा:
पुण्यात सापडल्या ५१ लाखांच्या परदेशी बनावटीच्या ब्रँडेड सिगारेट्स
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची दिमाखदार पालखी
आता ओटीटीवर तंबाखूविरोधी सूचना सक्तीची !
स्वामीराज प्रकाशनतर्फे पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन
२६/११च्या वेळी जी सहृदयता दाखवली तशी कुस्तीगीरांच्या बाबतही दाखवावी असे आवाहन त्यांनी केले आहे. २८ मे रोजी जी फरफट झाली तशी फरफट होणार नाही अशी अपेक्षा आहे. आपण त्यात लक्ष घालावं व तोडगा काढावा अशी विनंतीही शेवटी राज ठाकरे यानी केली आहे.