हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्याचा राज यांचा निर्धार असून त्यांनी अयोध्येला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. राज ठाकरे हे दिवाळीत अयोध्येत जाणार आहेत.

राज ठाकरे यांचे निवास्थान कृष्णकुंजवर आज कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

त्यापूर्वी कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी शिवतिर्थावरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. कांचनगिरीजी यांनी परप्रांतियांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

मागील दोन वर्षांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचे महंतांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसे आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.

Exit mobile version