‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’

‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’

गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेत आले आहेत. त्या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यावरून आज, १७ एप्रिल रोजी नवनीत राणा यांनी शिवसेनेला धारेवर धरत राज ठाकरेंच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. पुढे राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जागा घेतील, अशी टीका नवनीत राणांनी केली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज ठाकरे पुढे आणत आहेत. त्याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. शिवसेनेने फक्त सत्तेसाठी काँग्रेसची साथ घेतली. ज्या प्रमाणे बाळासाहेबांनी संघर्ष केला त्याचप्रमाणे सध्या राज ठाकरे संघर्ष करत आहेत. त्यामुळे पुढे उद्धव ठाकरेंची जागा हे राज ठाकरे घेतील, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर एकदा म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्र्यांची जागा आता राणा घेणार आहेत. मात्र, मला वाटते ही जागा आता राज ठाकरे घेतील. तसेच आज शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनावर त्या म्हणाल्या, जे लोक म्हणत आहेत मुंबईत येऊन दाखवा. पायावर आले तर पायावर जाऊ देणार नाही. पण आम्ही शांततेच्या मार्गाने देवाचे नामस्मरण करण्यासाठी येणार आहोत. तसेच त्यांनी पोलिसांना आवाहन केले की, जे  शिवसेना कार्यकर्ते आमच्या घराबाहेर आले आहेत त्यांना पोलिसांनी थांबू नये त्यांना आतमध्ये येऊ द्या, असे राणा म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

राज ठाकरे ५ जूनला जाणार अयोध्येला; मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास

शिवसेना कार्यकर्त्यांची आमदार रवी राणांना शिवीगाळ

पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी फरार

दिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी

दरम्यान, राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर आलेल्या शिवसैनिकांचे रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी हार घालून स्वागत केले आणि शिवसैनिकांना पाणी आणि जूस देखील दिल्याचे नवनीत राणांनी सांगितले आहे.

Exit mobile version