हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे करणार महाआरती

हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे करणार महाआरती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील एका प्रसिद्ध हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. पुण्यातल्या खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेतर्फे या महाआरतीचे पोस्टर तयार करण्यात आले असून या पोस्टरवर राज ठाकरेंचे हिंदुजननायक असा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे पुण्यात महाआरती होणार असून, तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी हनुमान चालीसेच पठण करण्यास चालू आहे. औरंगाबाद मध्ये रस्त्यावरच मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठन करण्यास सुरवात केली आहे. तसेच मुंबईत दादरमध्येदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान जयंतीनिम्मित आरतीच आयोजन केले आहे.

राज ठाकरे हे कालचं पुण्याला रवाना झाले आहेत. आज, १६ एप्रिल रोजी प्रथम राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरेंची भेट घेणार आहेत. त्यांनतर पुण्यातल्या खालकर मारुती चौकात एका प्रसिद्ध मंदिरात महाआरती करणार आहेत. राज ठाकरे यांनीच मंदिराच्या दुरुस्तीसाठी मदत केल्याचा दावा मनसे नेते अजय शिंदे यांनी केला आहे. तसेच कारेवनगर येथील हनुमान मंदिरात राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार आहे.

हे ही वाचा:

दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत

पंजाबमध्ये १ जुलैपासून ३०० युनिट वीज मोफत

रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!

रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

दरम्यान, गुडीपाडवा मेळाव्यानंतर मनसेने मशिदीवरील भोग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सामना ऑफिससबाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता मनसेकडून आक्रमक होत संजय राऊत यांच्याविरोधात पोस्टरबाजी  केल्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version