३ मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर उतरवा नाहीतर…

३ मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर उतरवा नाहीतर…

राज ठाकरेंनी दिला सज्जड दम

गेल्या काही दिवसांत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या विशाल सभेत भोंग्यावरून निर्वाणीचा इशारा देत ३ मे पर्यंत जर मशिदींवरचे भोंगे उतरविले नाहीत तर राज्यातील प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली जाईल, असा सज्जड दम भरला.

सडेतोड मुद्दे उपस्थित करत राज ठाकरेंनी ही सभा जिंकली. भोंग्यांच्या विषयावर त्यांनी जुने व्हीडिओ दाखवत आपण ही भूमिका खूप आधीपासूनच घेतली होती हे सांगत विरोधकांवर प्रहार केले. ते म्हणाले की, देशातील मुसलमानांना सांगतो. कशाला हवेत लाऊडस्पीकर. सकाळची अजान देताना कशाला हवेत स्पीकर. कुणाला कळवायचे असते. रस्ते कशाला अडवता. घरात नमाज पढा.

राज ठाकरेंनी सांगितले की, १ ऑगस्ट २०१८ला मी म्हणालो होतो की, सायलेन्स झोन आम्हाला. मशिदीत मात्र लाऊडस्पीकर लावतात. मला तर वाटले की बांगेची कॉन्सर्ट आहे. लाऊडस्पीकर कशाला हवाय १२ महिने. धर्म प्रत्येकाने आपापल्या घरात ठेवावा. मशिदींत भोंगे बंद व्हायला हवेत. हे तेव्हाच बोललो होतो. अजित पवारांना ऐकू आलं नाही. मी बोललो ऐकू आलं नाही. लॉकडाऊनमध्ये कान साफ झाला असेल. गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला.

राज ठाकरेंनी सांगितले की, चुकीचं काय बोललो. या मशिदींवरच्या भोंग्यांचा त्रास होतो.यात धार्मिक विषय काय आहे?तुम्हाला नमाज पढायचा आहे, तो घरात पढा. रस्ते कशाला, फुटपाथ कशाला अडवत आहात. प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय. हे समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार. आम्ही वातावरण बिघडवत नाही. हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. विद्यार्थी, महिला, वयस्करांना त्रास होतो. पाच वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर ते सगळे बेसूर असतात. राज्य सरकारला सांगणे आहे यापासून मागे हटणार नाही. काय करायचे आहे ते करा.

हे ही वाचा:

शिष्यवृत्तीचा तिढा अखेर मोदी सरकारने सोडवला!

‘दहशत माजवण्याचा मविआ कडून प्रयत्न’

वंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य

ती तरुणी खोटे का बोलत आहे माहीत नाही, पण मी अजूनही तिच्या पाठीशी!

या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशांत तुम्हाला बंदी आहे. निमूटपणे ऐकतात ना तिथे. कोणता धर्म आहे जो दुसऱ्यांना त्रास देतो. रमझान सुरू आहे समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो. नवरात्री असते. १० दिवसांत समजू शकतो. तरीही लाऊडस्पीकर  कमी आवाजातच लावला पाहिजे. एक सणवार असेल तर समजू शकतो. ३६५ दिवस कशासाठी ऐकवता कुणासाठी. ३ मेला ईद आहे. राज्य सरकारला गृहखात्याला विनंती आहे की, कुठचीही दंगल आम्हाला निर्माण करायची नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे महाराष्ट्रातील मशिदींच्या मौलवींना बोलवा लाऊडस्पीकर उतरले पाहिजेत. ३ तारखेनंतर कोणताही त्रास होणार नाही. १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे. ‘इतरांना त्रास देऊन प्रार्थना करा असे कोणताही धर्म सांगत नाही. पहाटेची झोप बिघडवणे योग्य नाही. त्यांना परवानगी देता कामा नये.’

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यावर गृहखात्याला काय प्रॉब्लेम आहे. मतांसाठी हे होतेय काय? मतांसाठी धर्म चालवणार आणि आम्ही बघत बसायचं हातावर हात ठेवून. देशभर हा त्रास आहे. तमाम हिंदूंना सांगणे आहे. ३ तारखेपर्यंत ऐकले नाहीत. जिकडे बांग सुरू असेल तिथे देशभर चालिसा लागली पाहिजे. आम्हाला होतो तर त्यांनाही होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.

यावर राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही राज ठाकरे बरसले.  आव्हाड म्हणतात, मदरशात वस्तरा सापडला तर राजकारणातून सन्यास घेईन. दिसणार कसा वस्तरा दाढीच करत नाहीत. बद्धीची कीव करावीशी वाटते, यांच्या. आव्हाड आता चार गोष्टी वाचून दाखवतो ऐका. असे म्हणत राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्या मुंब्रा या मतदारसंघात कशापद्धतीने अतिरेकी पकडले गेले त्याचे पुरावेच दिले.

राज म्हणाले की, देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातो. आमचा मनसेचा सलीम शेख बसला आहे. याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात पण सलीम निवडून येतो. याचं कारण हे मराठी मुसलमान देशावर प्रेम करणारे असंख्य आहेत पण ते भरडले जात आहेत.

Exit mobile version