राज ठाकरेंची मनसे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड!

पक्षाच्या बैठकीत निर्णय

राज ठाकरेंची मनसे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष पदासाठी राज ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे.पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत पार पडलेल्या आजच्या निवडणूक प्रक्रियेत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज ठाकरे यांची २०२८ पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांसमोर ही प्रक्रिया पार पडली आहे.

याबाबत माहिती देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची, पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया आज मुंबईत पार पडली.या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची नेमणूक करावी अशी मागणी आमच्याकडून करण्यात आली आणि नितीन सरनाईक यांनी याला अनुमोदन दिले.यानंतर सर्वांच्या एकमताने पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची निवड करण्यात आली.२०२३ ते २०२८ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

हेही वाचा..

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारसोबत चर्चेला तयार!

नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार, पेमा खांडूं बनले मुख्यमंत्री!

पायाभूत विकासप्रकल्पांची कामे गतीने मार्गी लावा

 

 

Exit mobile version