महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुपारी एक वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.
गेले काही दिवस राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष पेटलेला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यात अनेक माणसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान
राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट
या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद अतिशय महत्वाची ठरणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर राज्यभर होणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवरील कारवाई संदर्भात राज ठाकरे आपली बाजू मांडू शकतात. तर या पत्रकार परिधाडीतून राज ठाकरे पुन्हा सरकार विरोधात काय हल्ला चढवणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे बुधवार, ४ मे पासून मनसेने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या माध्यमातून लाऊड स्पिकरवर हनुमान चालीसा लावण्यात आलेली पाहायला मिळाली. तर राज्यात पोलिस खात्याकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आल्याचे दिसत आहे.