मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंचे घणाघाती भाषण
सध्या राज्यात काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही. विरोधक, सत्ताधारी आपल्याला संपविले जाणार आहे, असे म्हणत आहेत. निवडणुकांची चर्चा सुरू आहे. पण त्या आता होणार नाहीत. ओबीसीचं कारण पुढे केलं गेलं. म्हणे मोजणी करायची आहे. सगळे खोटे. यांना घ्यायच्याच नव्हत्या निवडणुका. तीन महिने पुढे ढकलत आहोत, असे म्हटले गेले. पण जूनमध्ये पाऊस सुरू होईल. तेव्हा घेणार आहात का? दिवाळीनंतरच निवडणुका होतील, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील परिस्थितीचा समाचार घेतला. राज्यपालांसह सगळ्या पक्षांवर, राजकीय परिस्थितीवर त्यांनी कडवट टीका केली.
मनसेच्या १६व्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच मुंबईबाहेर वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज ठाकरे म्हणाले की, लोकांना हव्यात कुठे निवडणुका. एकदा जनतेचा कानोसा घ्या. तुमच्या आहेत का नाहीत का याचा रस नाही लोकांना. निवडणुकीला उभे राहणाऱ्यांनाच रस आहे. आपल्याला तिकीट मिळते आहे का? कित्येकांना त्यातही रस नसतो. नुसतं तिकीट देतो म्हटले की, कमाईला सुरुवात करतो. आतापासून बोरं वेचून ठेवली आहेत मी. पण या निवडणुका होऊ नयेत. दोन्ही बाजूंनी विन विन. प्रशासक पण आपल्याच हातात. सगळं आम्हीच बघणार.
हे ही वाचा:
….म्हणून फ्लिपकार्टने महिलांसमोर घातले लोटांगण
भारतात स्थापन होणार जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध केंद्र
भारतातून हवाई सफर होणार पूर्ववत
राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर
काय चालले आहे. राज्यात सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत, विरोधक म्हणतात आम्हाला मग उरले कोण उरलो आपण. वीट आला लोकांना आता. मी आतापर्यंत अशी परिस्थिती कधी बघितली नाही. काय प्रकारचे आरोप करत आहेत. शिव्या काय देतायत. कुठची भाषा. राजकारणातल्या पुढच्या पिढ्या काय बघतायत. याच गोष्टी बोलायच्या असतील. ग्रामपंचायतीला काय सुरू असेल भविष्यात काय होईल. मागचा पुढचा विचार न करता ते बऱळायचं. संजय राऊत
कितीही बोलतात. या वातावरणात मतदान करावं असं वाटतं आहे का? शालेय जीवन, महिलांचे प्रश्न, कॉलेजमधील मुलांच काय होणार, नोकऱ्यांचे प्रश्न कुणी त्यावर बोलत नाही. त्यांनी शहरात यायचं की, ग्रामीण भागात त्यावर कुणी बोलत नाही. एसटी सुरू होणार की नाही. एकमेकांवर रेड टाकत आहे. त्याची चिंता लोकांना काय देणंघेणं आहे.