उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान

उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आता वर चढत चालला आहे. राज ठाकरे यांनी दिंडोशी येथील सभेत घणाघाती भाषण करताना प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.

ते म्हणाले की, निवडणुकीच्या सभा आता कंटाळवाण्या होत आहेत.  वर्षांत जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आहे.  शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खान राहिले आहेत. वर्सोव्यात हारून खान यांना तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार उर्दू पत्रक काढत आहेत. मराठवाड्यात म्हण होती बाण की खान. उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला आहे. फक्त राहिला आहे तो म्हणजे खान. वर्सोवा उमेदवार हारून खान देण्यात आला. कडवट हिंदूत्व कुठे गेले आहेत ? ते म्हणजे मुस्लिम उमेदवारापर्यंत गेली आहे. उर्दूमध्ये पत्र काढत आहेत”.

हे ही वाचा:

राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…

आदिवासी मुलींशी लग्न करणाऱ्या घुसखोरांना आता जमीन मिळणार नाही!

बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

‘कहो दिल से, अतुलजी फिरसे’

ज्यांच्याविरोधात एका पक्षाची हयात गेली ती शिवसेना काँग्रेससोबत सत्तेत जाऊन बसली. आज बाळासाहेब असते तर काय वाटलं असतं त्यांना. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे दुकान काँग्रेसच्या दुकानाच्या बाजुला लावलं. स्वताच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार विसरले. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी दादर येथे शिवाजी पार्क येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीप महोत्सवादरम्यान. मात्र कालच तिथे मीटर काढून घेऊन गेले. आज तिथेच हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान येत आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही दिवाळीचे लाईट बंद करत आहात, म्हणजे कमालच झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आले असते तर दिवा बंद करणं हे मी समजू शकतो. ज्यांच्या डेक्यातच प्रकाश पिटत त्यांनी त्यांच्यासाठी दिवे तरी कशाला दाखवा? उद्धव ठाकरेंची सभा असती तर मी समजू शकतो की, त्यांना ते लाईट चालत नाहीत. त्यांना हिंदूच्या लाईटचा डोळ्यांना त्रास होतो. आपण समजू शकतो

राज ठाकरेंनी दुसरा मुद्दा उपस्थित केला की, “मुंबईत बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. माझा मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. ४८ तास दिले तर गुन्हे थांबतील.

Exit mobile version