राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!

ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे गेले!

राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची प्रथमच वरळी कोळीवाड्यात सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वरळी मतदारसंघात राज ठाकरेंनी घणाघाती भाषणाद्वारे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा प्रचार केला. त्यावेळी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांकडून महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फतव्यांचा उल्लेख केला. या मतदारसंघात संदीप देशपांडे हे उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांना टक्कर देणार आहेत. तर याच मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिलिंद देवराही उभे आहेत. त्यामुळे इथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

राज ठाकरे म्हणाले की, आज काही मौलवी फतवे काढत आहेत. तर सगळी मतं ही महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी. जर ते फतवे काढत असतील तर आज मी देखील फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे ज्या मतदारसंघात उमेदवार असतील तेथे आमच्या पाठीशी उभे राहावं. माझ्या हातात सत्ता द्या. सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्व मशिदीवरचे भोंगे खाली उतरवले नाहीतर ना, तर परत राजकारण सांगणार नाही. जर त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर हे आमच्या खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना आदेश देईन आणि ते रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील.

हे ही वाचा:

अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…

संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही!

५० लाख रुपये दे नाहीतर… शाहरुख खानला धमकी!

‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बॅनर्सवरील नावापुढंचं हिंदूहृदयसम्राट हे बिरुद काढलं. ते का काढलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून. तसेच त्यांना ते परवडणारं नाही. तसेच काही उर्दू बॅनर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे नाव टाकलं. आज बाळासाहेब हयात असायला हवे होते. त्यांनी एकेकाला फोडून काढलं असतं”,

राज ठाकरेंनी सांगितले की, “उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात काहीही विचारधारा उरलेली नाही. २०१९ नंतर कोणाचं सरकार येणार? हेच आपण पाहत बसलो होतो. एकेदिवशी सकाळी ६ वाजता कळलं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत. आधी तर विश्वासच बसला नाही. अर्धा तास ते लग्न टिकलं. अर्ध्या तासाच घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले. यांना जनाची नाही आणि मनाचीही लाज नाही. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या बरोबर सत्तेत जाऊन बसले.

Exit mobile version