थकलेली, हुकलेली माणसं विधानसभेत पाठवून काय होणार, आग असलेली माणसं हवीत!

अमित ठाकरेंच्या प्रचारार्थ प्रभादेवीत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी केला घणाघात

थकलेली, हुकलेली माणसं विधानसभेत पाठवून काय होणार, आग असलेली माणसं हवीत!

अमितच्या विरोधात जे उभे आहेत त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढून शकतो. मला त्या घाणीत हात घालायचा नाही. माझ्यासाठी महाराष्ट्र, मुंबई महत्त्वाची आहे. अशी माणसे विधानसभेत पाठवली पाहिजेत, ज्यांच्या मनात आग आहे. २४ तास लोकांच्या हाकेला ओ देणारी माणसे हवी आहेत. अमित राज ठाकरे असं नाव असलं तरी त्याला भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. मी त्यालाच नव्हे तर सगळ्या उमेदवारांना सांगितले की, तुमचा मोबाईल लोकांना दिला पाहिजे, तुम्ही २४ तास उपलब्ध असले पाहिजेत. आज जो राजकारणाचा विचका झालेला आहे. नव्या ताकदीचे लोक विधानसभेत हवेत. थकलेली हुकलेली माणसं पाठवून काय होणार आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे घेतलेल्या सभेत विरोधकांवर घणाघात केला. तसेच आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी काय केले पाहिजे याविषयीही टिप्पणी केली.

राज ठाकरे म्हणाले की, आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहिले तेव्हा ठाकरे घराण्यातील कुणीतरी निवडणूक लढवतो आहे हे पाहून मी तिथे आमचा उमेदवार दिला नाही. पण मी फोन करून माझ्यासाठीही पुढे काहीतरी करा, असेही म्हटले नाही. अमित ठाकरेसाठी मी भिका मागणार नाही. लोकसभेसाठी मी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा माझ्या मनात अमित ठाकरेला उभे करण्याचा विचारही नव्हता. अमित ठाकरे उभा आहे म्हणन तुम्ही उमेदवार मागे घ्या असे मी कुणालाही सांगितले नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण त्याला निवडून नक्की आणणार.

राज ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांच्याविरोधात उभे राहिलेल्या अन्य पक्षांच्या उमेदवारांना उद्देशून टीका केली. अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उबाठा गटाचे महेश सावंत उभे आहेत. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जो कुणाचाच झाला नाही त्याबद्दल काय बोलायचं. बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. तिथे आमदारकीला उभी राहिली मग शिवसेनेत आली. मग निवडणूक आली. मग पेट्रोल पंपावर एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्या तिथून थेट एकनाथ शिंदे यांच्याकडेच गेले. कोण ही माणसं. त्यांच्याबद्दल किती बोलणार? याच व्यक्तीबरोबर जे उभे आहेत. ते काँग्रेसमध्ये नगरसेवकपदाला उभे होते. मी सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडलो. मी राजकीय पक्षात गेलो नाही. बाळासाहेबांना सांगून गेलो. ते सोडून कुणाच्याही हाताखाली काम करू शकणार नव्हतो.

हे ही वाचा:

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या रेवन्नाचा जामीन अर्ज फेटाळला

काँग्रेसकडून समाजात फूट, राष्ट्रीय शत्रूंविरोधात एकत्र येण्याची गरज!

संसदेत काँग्रेस अन रस्त्यावर मुस्लीम; वक्फ दुरुस्ती विधेयक रोखण्याचे प्रयत्न सुरू!

मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या जिम्नॅस्ट्सचे निर्विवाद वर्चस्व !

राज ठाकरेंनी सांगितली की, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रार्थना केली आहे. हे खुर्चीसाठीचं स्वप्न नाहीए. जे जगात पाहिलं ते महाराष्ट्रात आणायचं आहे. तरुणांमध्ये कोणतीह कमतरता नाहीए. नवा विचार देणारी माणसं नाहीएत, ती नवी स्वप्न आशा घेऊन तरुण तरुणी पुढे आल्या पाहिजे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. नवा विचार दिलाय. तो विचार मारण्यासाठी औरंगजेब येतो तो विचार काय असेल हे बघा. या महाराष्ट्रात कुणाचा कुणावर विश्वास बसत नाही. आपलेच लोक फितुरी करतात. म्हणून नवीन विचारांचे, पोटात आग असलेले लोक उभे आहेत. प्रभादेवीकरांच्या साक्षीने सर्व उमदवारांना रेल्वे इंजिनावर बटण दावून विजयी करा.

 

Exit mobile version