मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काढला चिमटा
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे मोठ्या संख्येने खाली उतरविल्यानंतर त्याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत एक ट्विट केले आहे, ते चांगले चर्चेत आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
उत्तर प्रदेशात जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर खाली उतरविण्यात आले आहेत. त्यात मंदिरे, मशिदी यांचा समावेश आहे. त्यासाठी जवळपास ३७ हजार धार्मिक गुरूंशी त्यांनी चर्चाही केली होती. शिवाय, धार्मिक स्थळांच्या परिसरातच या भोंग्यांचा आवाज मर्यादित असायला हवा असा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयचा सर्वस्तरावर कौतुक होते आहे.
हे ही वाचा:
काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
‘संजय राऊत लकडावाला यांच्या रिसॉर्टमध्ये राहायचे’
त्यावरूनच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान केले आहे.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कला झालेल्या सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात त्यांनी हे भोंगे उतरवा नाहीतर आम्ही हनुमान चालिसा म्हणू असा इशारा दिला होता. त्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत भोंगे उतरविले नाहीत तर प्रत्येक मशिदीसमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणू असा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण टिपेला पोहोचले आहे.
महाराष्ट्रातील सरकारने अनेक बैठका घेत परिस्थितीची चर्चा केली पण अद्याप भोंग्यांबाबत काय करायचे हा निर्णय ते घेऊ शकलेले नाहीत. औरंगाबाद येथे आता राज ठाकरे यांनी सभा होत आहे, त्यात ते काय भूमिका घेणार याविषयीही चर्चा सुरू आहे.