हे टीझर्स, खरा पिक्चर शिवतीर्थावर गुढीपाडव्याला!

हे टीझर्स, खरा पिक्चर शिवतीर्थावर गुढीपाडव्याला!

राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या १६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, आज जे मी बोलणार आहे ते टीझर्स आहेत माझ्या भाषणातील. ट्रेलर्स आहे. २ एप्रिलला खरा पिक्चर. गुढीपाडव्याला आपण शिवतीर्थावर या.

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी केली. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल वेगळ्या अंगाने चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात कोरोना काळातील कटू आठवणींनी केली आणि नंतर ते राजकीय परिस्थितीबद्दल बोलले.

मोदींनी महिन्यातून एकदा लॉकडाऊन लावावा

ते म्हणाले की, दोन वर्षे भाषण केले नाही कुठेही मी. मुलाखती दिल्या. पाच मिनिटे बोललो दहा मिनिटे बोललो. पण भाषण केले नाही. दोन वर्षांपूर्वी आपण आझाद मैदानमध्ये मोर्चा काढला ते माझे शेवटचे भाषण. त्यानंतर मी बोललो नाही. तुम्ही पण बोलला नाहीत. याप्रकराचे दिवस आपण पाहू असा विचार केला नसेल. रस्त्यांवर शुकशुकाट आहे घरेच्या घरे घाबरली आहेत. कुटुंबांना समजत नाही की काय होणार. सहज स्पर्श करायला पण भीती वाटू लागली. घरातल्या माणसाने दिलेला पाण्याचा ग्लासही घेण्यास संशय वाटू लागला. कधीही अशी गोष्ट पाहिली नव्हती. इतकी शांतता मी कधीही अनुभवली नव्हती. बाहेरगावी जातो आसपास शेतं दिसतात. गाडी बंद करतो ती शांतता असते ती सगळीकडे पसरली होती. फक्त पक्ष्यांचे आवाज होते. नरेंद्र मोदींना कळवावे महिन्यातून एकदा लॉकडाऊन ठेवा. शांतता किती भीतीदायक होती पण चांगली होती.

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली अर्पण करून राज ठाकरे यांनी इतिहासाकडे मोर्चा वळविला.

बाबासाहेब पुरंदरेंची जात पाहिली

ते म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट बनवले. इतिहास नाही बघायचा. जात बघायची. लिहिलंय कुणी. हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष जातीत गुंतवून ठेवत आहेत इतिहासात नाही. काय कष्ट घेतले त्यांनी. शिवाजी नाव उच्चारले की हा माणूस तिथे जायचा. शोध घेण्यासाठी. लोकांना काही सांगू शकेन, ही त्यांची भावना असायची.

हे ही वाचा:

राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच होतील निवडणुका!

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर

माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांच्या मुलीने केली ही दमदार कामगिरी

 

राज्यपालांवर टीकास्त्र

शिवशाहिरांबद्दल बोलतानाच त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मोर्चा वळविला आणि त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राज्यपालांना समज वगैरे काही आहे का, मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना रामदास, शिवाजी महाराज यातले काही कळते का? संबंध आहे का आपला कशाशी? नुसतं बोलून जायचं. शिवाजींनी कधी सांगितलं नाही रामदास माझे गुरू होते, ना रामदासांनी सांगितले आपण शिवाजी महाराजांचे गुरू होतो. रामदासांनी जे लिहिलयं ते माझ्या घरात लावलं आहे. आजपर्यंत इतकं चांगलं मी वाचलेलं नाही. शोधा कॉम्प्युटरवर. निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। आता धाड पडली की कळतं श्रीमंत आहे. योगी सापडतच नाही. आमच्या लोकांना फक्त बदनाम करायचं आणि मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरू आहे.

राज ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचाही समाचार त्यांनी घेतला. शिवाय, यावरून मीडियाने जे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला, त्यावरही ते बरसले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसारच

आपण सगळे सण तिथीला साजरे करतो. दिवाळी वेगळ्या तारखेला. प्रत्येक सण तिथीनुसार साजरा होतो. हा माझ्या राजाचा जन्मदिवस आहे. तो सण आहे जयंती नाही. महाराष्ट्राचा सण आहे. तो तिथीने साजरा करायचा २१ मार्चला धुमधडाक्यात करूया.

अमित ठाकरे मनसे युवासेना प्रमुख

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसे युवा सेनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Exit mobile version