राज ठाकरे यांनी केला घणाघात
शरद पवार हे नेहमीच शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. ते मान्य आहे पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाहीत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या विशाल सभेत उपस्थित केला तेव्हा सर्व श्रोते स्तब्ध झाले.
राज ठाकरे म्हणाले की, पवार साहेब भाषण करतात त्यावेळी हा महाराष्ट्र कुणाचा तर शाहू फुले आंबेडकरांचा असे म्हणतात. मान्य आहे पण त्या अगादोर तो छत्रपती शिवरायांचा आहे. पण पवार साहेब कधीही छत्रपतींचे नाव घेताना दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचे नाव घेतले आणि मुसलमानांची मते गेली तर काय करायचे. म्हणून नाव घेत नाहीत. त्यावरचं राजकारण करायचं असेल तर ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिली. अफजलखान महाराष्ट्रात आला तर म्हणे त्यावेळी हिंदु मुसलमान असं काही नव्हतं. मग काय तो केसरी टूरसाठी आला होता का? छत्रपतींची ओळख काय, हातात ध्वज कोणता तर भागवत धर्माचा, संतांचा, मंदिरांवरचा. छत्रपती शिवरायांची हिरव्या झेंड्याविरुद्धची लढाई दिसली नाही का?
राष्ट्रवादीने आपण भूमिका बदलतो असं म्हटलं याचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले की, सोनिया गांधी विदेशी आहेत आणि त्या पंतप्रधान म्हणून चालणार नाहीत हे बोलणारे पहिले बाळासाहेब ठाकरे होते. मग तोच धागा पकडून पवारांनी काँग्रेस सोडली. ९९ ला बाहेर पडले आणि निवडणुका झाल्यावर काँग्रेससोबत गेले. कृषिमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. अशा असंख्य बदललेल्या भूमिका सांगता येतील.मी कोणती बदलली भूमिका. हिंदुत्वाची भूमिका माझी आजची नाही. पाकिस्तानी कलावंतांना हाकलून लावणारी संघटना कोणती होती तर ती मनसेच होती. परत पाक कलाकारांना चित्रपटांत घ्याल तर याद राखा, असा इशारा दिला होता. आझाद मैदान वर रझा अकादमीने मोर्चा काढला. पोलिस भगिनींना मारले. अनेक शारीरिक त्रास दिले. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांना मारले. एकानेही प्रतिक्रिया दिली नाही. मनसेने मोर्चा काढला. हा मोर्चाच इतका ताकदवान होता की त्यामुळे तत्कालिन पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांना काढून टाकले.
यांची प्रॉपर्टी जप्त केली तर पत्रकार परिषदेत शिव्या दिल्या. भडवा, चुतिया शब्द वापरले. कशामुळे झालं हे. अंगाशी आलं ना, असे म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना झापले. ते म्हणाले, हे कुठचे आहेत तेच कळत नाही. शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे. हे सगळे लवंडे. पूर्वी पत्रावळी असायची त्यात द्रोण असायचा. त्यात वरण टाकले की तो द्रोण लवंडायचा. हे तसे लवंडे आहेत. केवढं झोंबलं ते.
पवारांनी जातीपातीचे भेद गाडले पाहिजेत!
शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, त्यातून ते धर्माकडे बघतात. त्यांचा एखादा फोटो मिळेल का हात जोडताना मंदिरातला.नाही कारण ते नास्तिकच आहेत. ते धर्म मानत नाहीत. मग त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवतात. त्यांना अपेक्षित असलेले. पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला असे म्हणतात पण कोणत्या पानात सांगितला चुकीचा इतिहास ते सांगा ना? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद फोफावला. त्याआधी, प्रत्येक जातीतील माणसाला अभिमान होता. पण नंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष भडकावला गेला. इतिहास चुकीचा सांगितला म्हणे. मला सांगा. संभाजी बिग्रेड, सी ग्रेड या ९९ नंतरच कशा काय आल्या. यांनीच काढल्या. तुम्हाला एक मुलाखत घेतली. यांचे इतिहासकार कोण कोकाटे. कोण कोकाटे? शिवचरित्र रणजित देसाईंनी लिहिलं. शिवाजी सावंतांनी लिहिलं, मेहेंदळेंनी लिहिलं. शिवाजी महाराज घराघरात पोहोचले बाबासाहेब पुरंदरेंमुळे. हे नाकारता येणार नाही. आम्हाला इतिहास नाही बघायचा. ते कोणत्या जातीतील माणसाने लिहिलं ते बघायचं. काय चाललं आहे हे. तुमच्यासारख्या बुजुर्गांनी जातीपातीचा भेद गाडला पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी करत आहात तुम्ही. शरद पवारांकडे अनेक गुण आहेत. पण याचं काय करायचं.
हे ही वाचा:
शिवसेनेचा प्रवास ‘वसंत’ सेना ते ‘शरद’ सेना
चकितचंदू, जंत पाटील, दात आणि सुळे…
चित्रा वाघ यांनी ‘त्या’ मुलीच्या नावावर राजकारण केले
३ मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर उतरवा नाहीतर…
राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांना विनंती केली की, जातीपातीचा जो चिखल होतो आहे, यातून बाहेर या. यातून हाती काहीही लागणार ही. ही सर्व मंडळी तुमचा वापर करतील. कुठे गेले मराठा आरक्षण. लाखालाखाचे मोर्चे निघाले. एकटा राज ठाकरे सांगत होता ते होणार नाही. निवणुकीसाठी उचकवायं होतं. मत पदरात पाडून घ्यायची होती. आता नवीन काढलं ओबीसी समाजाबद्दल.
सव्वाशे वर्ष पेशवाई म्हणत नाहीत मराठेशाही शिवछत्रपतींनी आणले होते. प्रत्येक जातीलील माणूस ढत होता. संतांकडून घेतलेली शिकवण कुठे गेली. काय करतो आहोत. जातीने बघायला लागली मुले. पत्रकारांतही जातीची फाटाफूट आहे. आमची जात महाराष्ट्राला हरवत आहे. आमचाया राज्यातल्या जाती नष्ट करायला लागत नाही. मराठी कधी होणार मग हिंदू कधी होणार. कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी घेऊन बसले आहोत. माझी हात जोडून विनंती यांच्यापासून दूर राहा. स्वतःसठई महाराष्ट्राला खड्ड्यात घालतील.