राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. आमचे आंदोलन एका दिवसाचे नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जेवढे अजान झाली तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणारच हा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अजान ही घरातील मिक्सरच्या आवाज इतकीच हवी असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर मुंबईत आज ९० ते ९२ टक्के मशिदींवर सकाळची अजान झाली नाही असा दावा ठाकरे यांनी केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज सकाळपासून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रा बाहेरून फोन येत आहेत, पोलिसांचे फोन येत आहेत, अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसेस पाठवतायंत, ताब्यात घेतायंत, पकडत आहेत. हे फक्त आमच्या बाबतीतच का होत्ंय? एवढाच आम्हाला प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करतायत त्यांना सजा देणार आणि जे पालन करत नाहीयेत त्यांना संरक्षण देणार?
आज मुंबईत ९०-९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. आमचे लोकं तयार होते. पण मी त्या मशिदींचे, तिथल्या मौलवींचे आभार मानीन कारण त्यांना आमचा विषय समजला. मुंबईत एकूण ११४० मशिदी आहेत. त्यातल्या १३५ मशिदींमध्ये सकाळी ५ च्या आधी अजान झाली. यांच्यावर सरकार काय कारवाई करणार आहे? की फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना उचलणार आहे?
हे ही वाचा:
राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा
पण यावेळी राज ठाकरे यांनी हे सामूहिक प्रयत्नातून घडल्याचे ,म्हटले आहे. पोलिस दलाला धन्यवाद की त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली , माध्यमांनीही योग्य प्रकारे विषय पोहोचवला. सामूहिक प्रयत्नातून हे घडले. मला क्रेडिट घ्यायचे नाही. पण जो पर्यंत हा विषय निकालात निघत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही.
महाराष्ट्रात बहुतांशी मशिदी अनधिकृत आहेत. त्यावर भोंग्यांना सरकार परवानगी देते ते अधिकृत. ही गोष्ट कल्पनेच्या बाहेरची आहे. हा विषय फक्त सकाळच्या अजानचा नाहीये. दिवसभर जी काही बांग चालते ती परत चालली तर आमची लोकं हनुमान चालीसा लावणार. पोलीस त्यांना ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकतात. आम्हाला देताना एका दिवसाची देता. सणांना १०-१२ दिवसांची परवानगी देता. मग यांना वर्षभराची कशी देऊ शकतात?
त्यांनीही रोज परवानगी घ्यावी आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेत अजान व्हावी. जी मर्यादा नागरी वस्तीत ४५ ते ५५ डेसीबलपर्यंत आहे. म्हणजे घरच्या मिक्सरचा जेवढा आवाज असतो तेवढा आवाज. ह्यांना स्पीकर वरून कोणाला ऐकवायच आहे? जर म्हणतात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार करत आहोत तर कारवाईही त्याच प्रकारे व्हावी.
हे आंदोलन एका दिवसाचे नाही. यांना वाटत असेल की एक दिवस बांग न झाल्याने आम्ही खुश होऊ तर तसे नाही. आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार यांनी उल्लंघन केले तर आम्ही हनुमान चालीसा लावणार. हा विषय सामाजिक आहे. पण त्यांना धार्मिक वळण द्यायचा यांचा प्रत्यत्न असेल तर आम्हीही त्याला धार्मिक वळण देऊ. मला वातावरण बिघडवण्यात काहीही रस नाही. म्हणूनच औरंगाबादला सभे दरम्यान जेव्हा अजान झाली तेव्हा मी पोलिसांना सांगितले. अन्यथा काय झाले असते?
कधीतरी सभांना, कार्यक्रमाना लाऊड स्पीकर समजू शकतो. पण ३६५ दिवस? याचा त्रास महिलांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना, आजारी माणसांना होतो. माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा आहे का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी विचारला आहे.