आजपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीच्या उद्देशाने ते पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. नागपूरपासून राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात केली आहे.
नागपूर महापालिका निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्ववभूमीवर राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत.
नागपूरमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बैठक पार पडली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा. प्रत्येक जागेवर आपल्याला निवडणूक लढवायच्या आहेत. आपल्याजवळ तीन महिन्यांचा अवधी असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पक्ष वाढवण्यास त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. याशिवाय या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटीही घेणार आहेत.
आज सकाळी राज ठाकरे नागपुरात पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंचे स्वागत केले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आजपासून राज ठाकरे यांचं मिशन विदर्भ सुरु झाले आहे. राज ठाकरे या मिशनमध्ये नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत.
हे ही वाचा:
मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम
होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न
दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क
उद्या राज ठाकरे हे गाठीभेटी आणि राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते चंद्रपूर रवाना होणार आहेत. २० आणि २१ सप्टेंबरला ते अमरावतीत विभागावर बैठक होणार आहेत.