राज ठाकरेंना निमंत्रण, उद्धव ठाकरे यादीत नाहीत!

उद्धव ठाकरे हे व्हीआयपी नाहीत ते एक साधे आमदार आहेत, मंत्री गिरीश महाजन

राज ठाकरेंना निमंत्रण, उद्धव ठाकरे यादीत नाहीत!

अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.तशी जोरदार तयारी अयोध्येत सुरु आहे.देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, विरोधी पक्षातील प्रमुख नेते आणि सिने सृष्टीतील अभिनेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही.

मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण मिळाले आहे.यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत.राऊतांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे हे एक साधे आमदार आहेत.केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील.राज ठाकरेंचं या यादीमध्ये नाव असेल म्हणून त्यांना बोलावले असेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

जय श्रीराम: भाजी विक्रेत्याने तयार केलेले नऊ देशांची वेळ दाखवणारे घड्याळ राम मंदिराला भेट

शेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि…

खर्गेच्या आवाहनानंतर कॉंग्रेसला केवळ साडेपाच कोटींची देणगी

जय श्रीराम: प्रभू श्रीरामांच्या आजोळातून ३ हजार क्विंटल तांदूळ, सासरकडून सुका मेवा!

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, प्रभू राम मंदिर अभिषेक सोहळ्याला व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नामवंत अशा आठ हजारहुन जास्त लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील म्हणून त्यांना निमंत्रण दिले नसावे, तर राज ठाकरे यांचे नाव या यादीत असेल म्हणून त्यांना निमंत्रण दिले असावे.अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत, असे मंत्री गिरीश म्हणाले.

तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा.राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे असे हे हे म्हणतात.मात्र, उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे हे संपूर्ण जनतेला, राज्याला आणि देशाला माहित आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.त्यांना वाटत असेल की आपण व्हीव्हीआयपी आहोत मात्र, .केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत ते नसतील म्हणून त्यांना निमंत्रण दिले नसावे, असे मंत्री महाजन म्हणाले.

 

 

 

Exit mobile version