‘पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं’

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत.

‘पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी २७३ पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र दिले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे. पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. कोणत्याही पराभवाने खचून जाऊ नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. कारण, यातून हातात काही लागणार नाही. आज तुमच्याकडे फक्त पद आहे. दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलं असं नाही. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

पुढे राज ठाकरे म्हणाले, पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागत. भाजपा पक्षाने खूप संघर्ष केला. काँग्रेसच्या लोकांनी खूप संघर्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक वर्ष संघर्ष केले. १९६६ ला शिवसेना स्थापन झाली मात्र, सत्ता १९९५ साली आली. आजचे राजकारण पाहता प्रत्येकाला असे वाटते की, सर्वांना सर्व गोष्टी लवकर हव्या आहेत. सर्व पटकन झालं पाहिजे. मात्र त्यासाठी जीवाचं रान करावं लागते. आपल्याही जीवनात विजय झाले, पराभव झाले, मात्र खचलो नाही कधी आणि खचणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल

पुढे तुमच्यामधीलचं आमदार, खासदार बसायचं आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत.

Exit mobile version