महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, २३ ऑगस्ट रोजी सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी मविआवर निशाणा साधला आहे. ज्याचे जास्त आमदार तोच मुख्यमंत्री आणि हेच गणित ठरले होते. मात्र भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मागण्याचा अधिकारच कुठला? त्याआधीच मविआच्या वाटाघाटी झाल्या असाव्यात, असा आरोप राज ठाकरेंनी मविआवर केला आहे. राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
नुपूर शर्मा प्रकरणाबद्दल वक्तव्य करताना राज ठाकरे म्हणाले, हिंदूंवर आक्षेपार्ह बोलणाऱ्याला वेगळा नियम का? मी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं. झाकीर नाईक, ओवैसी हे कित्येकदा हिंदू देवीदेवतांविषयी आक्षेपार्ह बोलले आहेत त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
मला पक्ष चिन्हाची आणि नावाची गरज नाही, माझ्याकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या विचाराने मी पुढे जाणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले, वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो. शिवाजी महाराजांनी जो विचार दिला तोच विचार पुढे पेशव्यांनी पसरवला. पण कधी स्वत:ला छत्रपती म्हणवून घेतले नाही, त्यांचे म्हणणे होते की, छत्रपती तेच आहेत, आम्ही फक्त त्यांचा विचार पोहोचवतो, असंच माझं मतं आहे, मीही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे. मला नावाची गरज नाही माझ्याकडे विचार आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनवर निशाणा साधला आहे.
मी शिवसेना सोडली पण मी खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. तर मी बाळासाहेंबांना सांगून बाहेर पडलो. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. स्वत:चा पक्ष उभा केला. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष उभा केला, असंही यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. जेव्हा मी त्यावेळी बाळासाहेबांना भेटायला गेलो तेव्हा बाळासाहेबांनी माझ्यासमोर हात पसरले, मला मिठी मारली आणि मला म्हणाले, “जा”, अशी आठवणही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला देताना राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीला ताकतीने सामोरे जा. गणेश उत्सव साजरा झाल्यानंतर दौरे करणार आहोत, त्यासाठी तुम्ही तयार रहा. तसेच सण उत्सवात मनसेचे होर्डिंग हवेत, असंही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन
जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?
डान्सर सपना चौधरीला होणार अटक?
राज्यातील टोलमधून येणार पैसा कुठं जातो असा सवाल करत महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात देऊन बघा सगळे टोल बंद करून दाखवतो असंं आश्वासन राज ठाकरेंनी यावेळी दिलं आहे.