राज ठाकरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

राज ठाकरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून अभिंनदनही केले जात आहे. यादरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यंमत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विटरवर एक पत्र टाकून त्यांचे कौतुक केले आहे. पत्रात राज ठाकरे म्हणाले, सध्याचे सरकार आणण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले आणि एवढे करूनही तुमच्या चिंतेकडे दुर्लक्ष करून पक्षाला डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा पक्ष मोठा असतो हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले आहे. एवढेच नाही तर तुम्ही जे केले ते देशातील आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लक्षात ठेवतील.

हे ही वाचा:

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र, शिंदे सरकारचा निर्धार

भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!

शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले, तुमचा निर्णय म्हणजे पक्षाची शिस्त काय आहे, याचे सार आहे. तुमचे हे स्थान स्वीकारणे म्हणजे आधी दोरी खेचणे आणि नंतर धनुष्यातून लक्ष्य गाठण्यासाठी बाण सोडण्यासारखे आहे. मात्र, राजकारणात अनेकदा तसे होत नाही. त्यामुळे तुम्हाला देशाच्या भल्यासाठी कठोर परिश्रम करण्याची संधी मिळाली. पुढे राज ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी स्वतःला फडणवीसांचा मित्र म्हणवून घेतले आहे.

Exit mobile version